फलटण (प्रतिनिधी) : हॉटेल व्यवसायिकास गोड बोलून प्रेमाच्या जाळ्यात ओढत, खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत मारहाण करून तब्बल ४० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या सराईत टोळीला फलटण शहर पोलिसांनी अवघ्या दोन तासांत जेरबंद केले आहे.
फलटण शहर पोलिसांनी प्रेमाच्या जाळ्यात ओढून खंडणी उकळणाऱ्या टोळीला अवघ्या दोन तासांत जेरबंद केले आहे. ही टोळी हॉटेल व्यवसायिकांना गोड बोलून प्रेमाच्या जाळ्यात ओढत आणि खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत मारहाण करून खंडणी मागवत होती.
अटक असणारे आरोपी:
– साहिल रवि तारे
– वैभव बाळासो सस्ते
– रोहन नवीन काकडे
– विनायक बाळासो जाधव
– राज राम बोके
पोलिसांनी ४० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या या टोळीला पकडले आहे. उर्वरित दोन अनोळखी इसम व संबंधित महिलेचा शोध सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. रणजित सावंत (वडूज) यांच्या मार्गदर्शनाखाली झाली
दि. ११ फेब्रुवारी २०२६ रोजी फिर्यादी श्री. आनंद काशिनाथ दळवी (रा. कापुरहोळ, ता. भोर, जि. पुणे) यांना फलटण येथील एका महिलेने व्हॉट्सअॅप कॉलद्वारे संपर्क साधत प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर दि. १३ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.१५ वाजता बुधवार पेठ, फलटण येथील एका फ्लॅटवर बोलावून घेत कटकारस्थान रचण्यात आले.
तेथे आरोपींनी फिर्यादीस शिवीगाळ व मारहाण करत “बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवतो” अशी धमकी दिली. आरोपींनी ४० लाख रुपयांची खंडणी मागितली. त्यापैकी १ लाख ९५ हजार रुपये रोख, एटीएम व क्रेडिट कार्डद्वारे जबरदस्तीने घेतले. तसेच पुणे रस्त्यावर सोडण्याच्या बहाण्याने नेत असताना दोन अनोळखी इसमांनी गाडी अडवून फिर्यादीच्या गळ्यातील सुमारे २० तोळे वजनाची अंदाजे ३० लाख रुपये किमतीची सोन्याची चैन मारहाण करून हिसकावून घेतली.
या घटनेप्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४४/२०२६ भा.न्या.सं. कलम ३०८(५), ३०८(६), ३०९(६), १२६, ६१(२), ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१(३) अन्वये दि. १४ फेब्रुवारी २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक श्री. नितीन शिंदे करीत आहेत.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथके तयार करून तपास सुरू असताना पुढील आरोपींना ताब्यात घेण्यात आले :
साहिल रवि तारे (रा. दत्तनगर, फलटण)
वैभव बाळासो सस्ते (रा. सस्तेवाडी, ता. फलटण)
रोहन नवीन काकडे (रा. मंगळवार पेठ, फलटण)
विनायक बाळासो जाधव (रा. ठाकुरकी, ता. फलटण) राज राम बोके (रा. मंगळवार पेठ, ता. फलटण, जि. सातारा)अधिक तपासात आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे. उर्वरित दोन अनोळखी इसम व संबंधित महिलेचा शोध सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. रणजित सावंत (वडूज) यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. अरविंद काळे यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक श्री. नितीन शिंदे व त्यांच्या पथकाने केली.
फलटण शहर पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये समाधानाची भावना व्यक्त होत आहे. पुढील तपास सुरू आहे.