आपला जिल्हा
आंदरूड – जावली येथे खरीप हंगामपूर्व नियोजन सभा संपन्न ; शेतकऱ्यांना विविध योजनांचे मार्गदर्शन


सभेत सहाय्यक कृषी अधिकारी सतीश हिप्परकर, उप कृषी अधिकारी संजय अभंग, मंडल कृषी अधिकारी स्वप्नील बनकर, कृषी सखी तसेच युवा शेतकरी सुजित बोराटे, राहुल निंबाळकर, नामदेव पोकळे व सचिन पडर यांनी विविध कृषी विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले.
यामध्ये खरीप हंगाम राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत बाजरी प्रकल्पासाठी शेतकरी निवड व माती नमुने संकलन, कांदा काढणीनंतरचे व्यवस्थापन व कांदा चाळ उभारणी, कांदा बिजोत्पादन, हुमणी नियंत्रण, प्रकाश सापळे, फेरोमन सापळे, पक्षी थांबे यांसह नैसर्गिक शेती, सेंद्रिय खतांचा वापर, हिरवळीची खते, जीवाणू खतांचा वापर याबाबत जनजागृती करण्यात आली.Lorem ipsum dolor sit amet, consectetur.