महाराष्ट्र
बीएलओ ड्युटी शिक्षकांच्या जीवावर ; मुंबईत शिक्षक आयसीयूमध्ये दाखल

(मुंबई /प्रतिनिधी) : निवडणूक कामासाठी लावण्यात आलेली ‘बीएलओ’ ड्युटी आता शिक्षकांच्या जीवावर बेतत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. उन्हात तासन्तास फिरून मतदार पडताळणीचे काम करताना एका शिक्षकाच्या पायात रक्ताच्या गुठळ्या झाल्याने त्यांना थेट आयसीयूमध्ये दाखल करण्याची वेळ आली आहे. या घटनेमुळे शिक्षकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
भीमराव एकनाथ आढाव- रा. जावली ता. फलटण जि. सातारा येथील रहिवासी असुन देवनार या मुबंई महापालिकेच्या शाळेवरती शिक्षक म्हणून कामकाज पाहतात



