क्राईम न्युज

सुरवडी हद्दीत हातभट्टी दारू विक्रीवर पोलिसांचा छापा ; एकावर गुन्हा दाखल

(फलटण /प्रतिनिधी) : सुरवडी गावच्या हद्दीत बेकायदा गावठी हातभट्टी दारू विक्री करणाऱ्यावर फलटण ग्रामीण पोलिसांनी कारवाई करत एका व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, मा. पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सुरवडी येथील रेल्वे स्टेशन परिसरात एरपटच्या झाडाखाली छापा टाकला. यावेळी अभय पितांबर राठोड (रा. सुरवडी, ता. फलटण) हा उघड्यावर गावठी हातभट्टी दारूची बेकायदा व बिगर परवाना विक्री करताना आढळून आला.

पोलिसांनी त्याच्या ताब्यातून सुमारे ६ हजार ७५० रुपये किमतीची गावठी हातभट्टी दारू जप्त केली. याप्रकरणी अभय राठोड याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!