महाराष्ट्र
सामाजिक सलोखा राखण्यासाठी नागरिकांनी कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा – डीवायएसपी विशाल खांबे
फलटणमध्ये शांतता समितीची संयुक्त बैठक ; सामाजिक सलोखा कायम राखण्याचे प्रशासनाचे आवाहन


बैठकीची प्रस्तावना नायब तहसीलदार सोनवणे यांनी केली. यावेळी फलटण शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन शिंदे, नगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक, पत्रकार तसेच सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
बैठकीदरम्यान नगरसेवक अशोक जाधव यांनी फलटण शहरात कायम हिंदू-मुस्लिम ऐक्य असल्याचे सांगून पुढेही शहरातील शांतता आणि सामाजिक सलोखा अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका मांडली. समाजसेवक वसीम मनेर यांनी घडलेल्या प्रकाराचा तीव्र निषेध व्यक्त केला. नगरसेवक रोहित नागटिळे यांनी प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित इतर आरोपी आढळल्यास त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली.Lorem ipsum dolor sit amet, consectetur.