ताज्या घडामोडी
स्वबळाचा प्रयोग: जावलीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाची परीक्षा ; तालुका प्रमुख विकास नाळे यांच्या भूमिकेकडे लक्ष
सिद्धनाथ ग्रामविकास आघाडीचा यंदा स्वतंत्र पॅनल असणार का..?

(जावली/अजिंक्य आढाव )शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने जावली ग्रामपंचायत ला स्वबळाचा नारा दिला आहे. फलटण तालुक्यातील उद्धव ठाकरे गटाने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. जावली ग्रामपंचायतमध्ये 3 वार्ड असल्याने 9 सदस्य संख्या असुन या वर्षात आरक्षण सर्वसाधारण असल्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका अध्यक्ष विकास नाळे यांनी ग्रामपंचायत स्वतंत्र लढण्याची भूमिका घेत गटातील संभाव्य उमेदवारांची यादी लवकरच जाहिर करणार असल्याचे सांगितले आहे.
राजकारण म्हणजे लोकांच्या हितासाठी काम करणे आणि समाजाच्या भल्यासाठी निर्णय घेणे. जावली ग्रामपंचायत निवडणुकीत राजकारण म्हणजे लोकांच्या विश्वासासाठी लढणे आणि गावाच्या विकासासाठी काम करणे.
जावली ग्रामपंचायत निवडणुकीतील राजकारण
– स्वबळाचा नारा : उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने जावली ग्रामपंचायत निवडणुकीत स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे.
राजकीय चुरस: भाजप, राष्ट्रवादी आणि रासप, सिद्धनाथ ग्रामविकास आघाडी, शिवसेना आमनेसामने येणार असल्याचे चर्चा होत आहे
गावाच्या विकासासाठी काम- जावली ग्रामपंचायत निवडणुकीत गावाच्या विकासासाठी काम करणे हे मुख्य उद्दिष्ट आहे.
मागील निवडणूकीत गाव वॉर्डत राजे गट 6 सदस्य संख्यावर विजयी झाला तर रासपला 3 जागा मिळाल्या गत वर्षीत फेब्रुवारी महिन्यात मुदत संपत आल्याने राज्य शासनाच्या प्रशासक निर्णया ला नागपूर खंडपीठाने फटकारत ग्रामपंचायत निवडणूक जाहिर करण्याचे ठरवले आहे. यामुळे तारखा कधी जाहीर होणार या कडे लक्ष लागुन राहिले आहे.



