माहिती व तंत्रज्ञान
कमला निंबकर बालभवनमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी बोर्ड परीक्षेचे चंद्रकांत सस्ते यांचे विशेष मार्गदर्शन

(फलटण /प्रतिनिधी ): कमला निंबकर बालभवन च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी विषयाच्या बोर्ड परीक्षेचे मार्गदर्शन सत्र नुकतेच उत्साहात पार पडले. इंग्रजी विषयाचे ज्येष्ठ व अनुभवी शिक्षक श्री. चंद्रकांत सस्ते यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.
मार्गदर्शन सत्रामुळे विद्यार्थ्यांच्या बोर्ड परीक्षेच्या तयारीला निश्चितच बळ मिळाले असून इंग्रजी विषयातील भीती दूर होऊन आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जाण्याची प्रेरणा विद्यार्थ्यांना मिळाली.




