आता मूळ ओबीसींनी फक्त नेत्यांच्या सतरंज्या उचलायच्या का?

नुकत्याच झालेल्या फलटण पंचायत समिती सभापती व सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या निवडी मध्ये दोन्ही कडे ओबीसी आरक्षित जागा असून भाजप कडून दोन्ही कडे मूळ ओबीसींना संधी डावलली गेली. फलटण मध्ये तर भाजपच्या प्रामाणिक व निष्ठावंत असलेल्या मूळ ओबीसी सदस्यांना सुद्धा बाजूला करण्यात आले, पक्ष जातीय वाद करत आहे हे स्पष्ट होत आहे.
भाजपच्या नेत्यांना मूळ ओबीसी पदावरच नको आहेत ह्यातून स्पष्ट होताना दिसत आहे.
तरी मध्यंतरी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजप मध्ये प्रवेश केलेले स्वघोषित नेते आहेत त्यांचे तोंड का बंद आहे? कि ते फक्त स्वतःचा विचार करत आहेत? कि त्यांचा जलवा आता चालत नाहीये? स्वतःला कोणत पद मिळेल का ह्याची धडपड चालली आहे का? त्यामुळे त्यांचे तोंड बंद आहे का? त्यांना समाज फक्त बेरजेपुरता पाहिजे आहे हे ह्या वरून स्पष्ट होत आहे.
भाजप मधील ओबीसी कार्यकर्ते व नेते ह्यांचे मौन च सर्व काही सांगून जाते , अश्या लोकांनी परत समाजाच्या जीवावर राजकारण करू नये समाजाचा फक्त वापर करून घेऊ नये नाहीतर त्यांची जागा त्यांना दाखवली जाईल. अशी चर्चा आता सर्वसामान्य ओबीसी समाजामधून होत असताना दिसत आहे.
सत्ताधारी लोकांना ओबीसी समाज फक्त बेरजे पुरता पाहिजे आहे , आगामी काळात येणाऱ्या प्रत्येक निवडणुकी मध्ये ओबीसी समाज एकत्र येऊन जशास तसे उत्तर देईल.



