ताज्या घडामोडी

‘वाचन वेड’उपक्रमांतर्गत माण व फलटण तालुक्यातील विविध जिल्हा परिषद शाळांना ग्रंथालयाचे पुस्तकांचे वितरण

(फलटण/ प्रतिनिधी): पुणे येथील किरीटी मोरे व गोविंद शेठ या दोन पुस्तक मित्रांनी सुरू केलेल्या वाचन वेळ उपक्रम अंतर्गत फलटण व माण तालुक्यातील विविध जिल्हा परिषद शाळांमधील मुलांमध्ये वाचन संस्कृती रुजवण्यासाठी वाचनीय अशा ग्रंथालय पुस्तकांचे वितरण करण्यात आले. फलटण तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सासकल, पाटणेवाडी, हराटीमळा, पिंप्रद व माण तालुक्यातील माणगंगानगर, श्रीपालवण, कळसकरवाडी, मलवडी या शाळांमध्ये किरीटी मोरे व गोविंद शेठ यांनी ग्रंथालय पुस्तकाचे वितरण केले आहे. किरिटी मोरे व गोविंद शेठ या दोघांनी सामाजिक बांधिलकीच्या नात्याने आतापर्यंत साडेसहाशे च्या वर जिल्हा परिषद शाळांना ग्रंथालयाची पुस्तके दिली आहेत.

विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी लागावी. त्यांची भाषिक कौशल्य विकसित व्हावी त्यासोबतच विचार करण्याची प्रक्रिया त्यांच्यामध्ये सुरू व्हावी यासाठी हा उपक्रम सुरू केल्याची भावना किती मोरे व गोविंद शेठ यांनी व्यक्त केले. आपण ज्या समाजातून येतो त्या समाजासाठी काहीतरी देणं लागतो या भावनेतून या दोघांनी हा उपक्रम सुरू ठेवला आहे.

त्यांच्यामार्फत मिळालेल्या पुस्तकांचा निश्चित फायदा विद्यार्थ्यांना होत असून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी लागत आहे. त्यांनी दिलेल्या या पुस्तक भेटीसाठी मुख्याध्यापक विद्यार्थ्यांनी त्यांचे कृतज्ञतापूर्वक आभार व्यक्त केले आहेत. ही पुस्तके प्रगत शिक्षण संस्थेचे जनसंपर्क अधिकारी तथा सामाजिक कार्यकर्ते सोमीनाथ घोरपडे यांच्या संपर्कातून या शाळांपर्यंत पोहोचत आहेत.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!