आपला जिल्हा
जावली ग्रामपंचायत निवडणुकीसाठी युवा नेतृत्वाची नवी लाट ; शहर सोडून गावासाठी लढणारा तरुण..!
पुणे सोडून गावासाठी झटणारा उच्चशिक्षित तरुण; राजकारणात नवी दिशा देण्याचा निर्धार

(जावली/ प्रतिनिधी ): मोठ्या शहरात करिअरची संधी असतानाही गावाच्या विकासासाठी परतण्याचा निर्णय घेतलेल्या उच्चशिक्षित तरुणाची सध्या तालुक्यात जोरदार चर्चा आहे. MBA (Marketing & HR) पदवीधर असलेले अतुल आप्पासाहेब गोफणे यांनी पुण्यासारख्या शहरातील संधी बाजूला ठेवत थेट गावाच्या राजकारणात उडी घेतली आहे.
“गाव बदलायचे असेल तर सुशिक्षित तरुणांनी पुढे आले पाहिजे,” असे ठाम मत व्यक्त करत त्यांनी ग्रामविकासाला प्राधान्य देण्याचा निर्धार जाहीर केला. शहरातील अनुभव, व्यवस्थापन कौशल्य आणि आधुनिक दृष्टिकोन गावाच्या कारभारात आणण्याचा त्यांचा मानस आहे.
पक्षाने संधी दिल्यास काम करणार : अन्यथा अपक्ष ची भूमिका बजावणार..!
🔹 शहरातून गावाकडे – का घेतला निर्णय?
पुण्यात स्थिरावण्याची संधी असतानाही गावातील पाणी, रस्ते, शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या प्रश्नांनी त्यांना अस्वस्थ केले. “टीका करण्यापेक्षा प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करणे महत्त्वाचे,” असे ते म्हणाले.
पारदर्शक आणि डिजिटल कारभाराची भूमिका ग्रामपंचायतीचा कारभार पारदर्शक ठेवत डिजिटल सेवा सुरू करण्यावर त्यांचा भर आहे. निधीचा योग्य वापर आणि कामांची गुणवत्ता यावर लक्ष केंद्रित करण्याचे त्यांनी स्पष्ट केले.



