आपला जिल्हा

रामदास आठवले, विनोद तावडे, रामराव वडकुते, माया इवनाते यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारीची घोषणा

भाजपाने जातीय समीकरणांचा समतोल साधण्याचा प्रयत्न..!

(फलटण/ प्रतिनिधी)राज्यसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून निवडल्या जाणाऱ्या ७ जागांसाठी भाजपने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपकडून रामदास आठवले विनोद तावडे, रामराव वडकुते व माया चिंतामण ईवनाते यांना उमेदवारी दिली आहे.

महाराष्ट्रातील भाजपाच्या संख्याबळानुसार ४ उमेदवार हमखास निवडून येऊ शकतात. त्यानुसार भाजपने आपले उमेदवार जाहीर केले आहेत.कालच भाजपने इतर राज्यातील उमेदवार जाहीर केले होते. त्यावेळी महाराष्ट्रातून कुणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या.

भाजपाने अचानक चर्चेत नसलेले दोन नवे चेहरे बाहेर काढून सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे.रामराव ओळखते हे पूर्वाश्रेमीचे माजी आमदार प्रकाश शेंडगे यांचे कट्टर समर्थक मानले जात होते त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विधान परिषदेवर आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली होती. दरम्यानच्या काळात त्यांनी भाजपामध्ये प्रवेश करून ते परभणी जिल्हा भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणून सध्या कार्यरत होते. मराठवाड्यातील धनगर समाजाचा चेहरा म्हणून त्यांना ही संधी दिली आहे तसेच माया ईवनते या नागपूरच्या माजी महापौर राहिल्या असून त्या आदिवासी समाजामधून येतात सध्या त्या नागपूर महानगरपालिकेवर नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत.

भाजपाने ४ उमेदवारांच्या नावाची घोषणा करीत असताना जातीय समीकरणाचा समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!