आपला जिल्हादेश विदेश
ज्येष्ठ पौर्णिमा : बुद्धधम्माच्या इतिहासाला उजाळा देणारा पवित्र दिवस – सोमीनाथ घोरपडे


मार्गदर्शन करताना घोरपडे म्हणाले की, ज्येष्ठ पौर्णिमा हा दिवस बौद्ध धम्मात अत्यंत पवित्र आणि महत्त्वपूर्ण मानला जातो. याच दिवशी तथागत गौतम बुद्धांनी कपिलवस्तू येथे ‘महासमय सुत्त’ या महत्त्वपूर्ण धम्मदेशनेचा उपदेश केला होता. तसेच सम्यक संबोधी प्राप्तीनंतर ब्रह्मदेशातील व्यापारी तपस्सू आणि भल्लिक यांनी तथागतांना अन्नदान करून धम्माची दीक्षा स्वीकारली होती. याच दिवशी सम्राट अशोक यांची कन्या संघमित्रा आणि पुत्र महेंद्र यांनी बोधिवृक्षाची पवित्र फांदी श्रीलंकेत नेऊन बुद्ध धम्माच्या जागतिक प्रसाराला नवी दिशा दिली. त्यामुळे ज्येष्ठ पौर्णिमेला बौद्ध इतिहासात विशेष स्थान प्राप्त झाले आहे.
यावेळी त्यांनी सर्व बौद्ध बांधवांनी ज्येष्ठ पौर्णिमेनिमित्त जवळच्या बौद्ध विहारात जाऊन बुद्धवंदना, त्रिशरण आणि पंचशील ग्रहण करून धम्माचे आचरण करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमात भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे माजी कोषाध्यक्ष विठ्ठल निकाळजे सर यांनी माता रमाई यांच्यावरील ‘कुंकू लाविलं रमानं’ हे भावगीत सादर करून भोसले दाम्पत्याला विवाह संस्कार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील माता रमाई यांच्या त्याग, समर्पण आणि संघर्षमय योगदानाचा उल्लेख करत उपस्थितांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.Lorem ipsum dolor sit amet, consectetur.