आपला जिल्हा
राजमाता अहिल्यादेवी होळकर : लोककल्याणकारी राज्यकर्ती आणि स्त्रीशक्तीचे प्रेरणास्थान

(फलटण/ प्रतिनिधी )भारतीय इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी आहेत की ज्यांचे कार्य काळाच्या चौकटीत अडकून राहत नाही. राजमाता अहिल्यादेवी होळकर हे असेच एक व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या नावाचा उल्लेख होताच अनेकांच्या मनात धार्मिक स्थळांच्या जीर्णोद्धाराचे कार्य उभे राहते. परंतु त्यांची ओळख केवळ धर्मकार्य करणाऱ्या राणीपुरती मर्यादित करणे म्हणजे त्यांच्या कर्तृत्वावर अन्याय ठरेल. त्या एक न्यायप्रिय राज्यकर्त्या, कुशल प्रशासक, धैर्यवान नेत्या आणि लोककल्याणाला सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या शासिका होत्या.
– आयु. सोमीनाथ घोरपडे
संस्कार सचिव, भारतीय बौद्ध महासभा शाखा सातारा जिल्हा (पूर्व)
मो. ९२८४६५८६९०



