ताज्या घडामोडी

‘स्वच्छता हीच सेवा’ असा संदेश देणारे संत गाडगे बाबा यांच्या जयंतीचा फलटण नगरपरिषदेला पडला विसर.

फलटण : ‘स्वच्छता हीच सेवा’ असा संदेश देणारे थोर समाज सुधारक संत गाडगेबाबा यांची जयंती दि.२३ फेब्रुवारी रोजी असते तरी सर्व समाजसुधारक, संत , महात्मे व महापुरुष यांची जयंती शासकीय कार्यालयात साजरी करण्याची एक परंपरा आहे पण दि.२३ फेब्रुवारी २०२६ रोजी फलटण नगरपरिषदेने जयंती साजरी केली नाही मुख्याधिकारी तसेच सत्ताधारी, नगराध्यक्ष ,सर्व नगरसेवक यांना जयंतीचा विसर पडला.
एकीकडे स्वच्छ भारत अभियान चा नारा लावायचा आणि ज्यांनी समाजाला स्वच्छता हीच सेवा असा संदेश दिला स्वच्छतेचे महत्व पटवून दिले त्यांचीच जयंती विसरून जायची हे कितपत योग्य आहे? नगरपरिषदेलाच स्वच्छतेचे गांभीर्य नाही का ? . प्रशासन नक्की अश्या कोणत्या कामात व्यस्त आहे? त्यांना असे विसर कधीपासून पडायला लागले? फलटण नेमकं कोणत्या वळणावर चालले आहे ? असे अनेक प्रश्न सध्या उद्भवत आहेत.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!