(फलटण /प्रतिनिधी) – राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल 9 फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आला. तब्बल तब्बल 16 दिवस होऊन गेले तरी देखील जिल्हा परिषद अध्यक्ष व पंचायत समिती सभापती निवडीची तारीख जाहीर करण्यात आली नसून यामागे नेमका सरकारचा हेतू काय आहे हे स्पष्टपणे दिसून येत आहे.
आज राज्य शासनाच्या ग्रामीण विभागाने जि प अध्यक्ष व पंचायत समितीच्या सभापती निवडी बाबत एक आदेश पारित केला आहे या आदेशामध्ये ही 20 मार्च पर्यंत सदरच्या जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष व पंचायत समिती सभापतीच्या निवडीची तारीख जाहीर करण्याचे संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत.
या महायुतीच्या सरकारने निकाल जाहीर झाल्यानंतर पदाधिकारी निवडीसाठी एवढा कालावधी कशासाठी दिला जात आहे काठावरील जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये घोडेबाजारासाठी सरकार वाव देऊ पाहत आहे की, काय हे या निमित्ताने स्पष्टपणे दिसून येते. कारण याचा फायदा विद्यमान सत्तारूढ पक्षाला मिळत असतो.
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने काढलेल्या परिपत्रकानुसार, सातारा जिल्हा परिषद तसेच अंतर्गत पंचायत समित्यांची पहिली सभा २० मार्च २०२६ पूर्वी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. या सभेत जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच पंचायत समिती सभापती व उपसभापतींची निवड करण्यात येणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार १२ जिल्हा परिषद व त्याअंतर्गत १३५ पंचायत समित्यांच्या निवडणुका पूर्ण झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर नवनिर्वाचित सदस्यांचा कार्यकाळ पहिल्या बैठकीपासून सुरू होणार असल्याने जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने बैठका आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
सातारा जिल्ह्यात अध्यक्षपदासाठी कोणत्या पक्षाकडे संख्याबळ आहे, याबाबत राजकीय हालचालींना वेग आला असून सत्तास्थापनेसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. अध्यक्षपद कुणाकडे जाणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, जिल्हाधिकारी सातारा यांना शासनाकडून अधिकृत सूचना प्राप्त झाल्या असून, लवकरच जिल्हा परिषद सभेची तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सातारा जिल्हा परिषदेत सत्तेचा सारीपाट नेमका कुणाच्या हातात जाणार, याचा फैसला आता काही दिवसांतच होणार आहे.