फलटण (प्रतिनिधी) : भारतीय बौद्ध महासभा, फलटण तालुका शाखेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. ‘BSI मिशन 25’ अंतर्गत सर्व महापुरुष व महामातांना अभिवादन करण्याच्या उपक्रमाचा एक भाग म्हणून हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
यावेळी पदाधिकाऱ्यांनी शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव करत स्वराज्य, समता, न्याय आणि स्वाभिमान या मूल्यांचा समाजाने अंगीकार करणे आवश्यक असल्याचे सांगितले. शिवरायांचे विचार आजही समाजाला दिशा देणारे असून त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन बंधुता व सामाजिक न्यायाचा संदेश देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमास आयु. महावीर भालेराव, आयु. बाबासाहेब जगताप, आयु. बजरंग गायकवाड, आयु. आनंद जगताप, आयु. स्वप्निल गायकवाड, आयु. चंद्रकांत मोहिते आदी उपस्थित होते.
१९ फेब्रुवारी १६३० रोजी जन्मलेल्या शिवाजी महाराजांची २०२६ मध्ये ३९६ वी जयंती साजरी होत असून, मराठा साम्राज्याचे संस्थापक म्हणून त्यांचे कार्य आजही प्रेरणादायी मानले जाते.