आपला जिल्हा

फलटणमध्ये हप्त्याची मागणी करत सलूनमध्ये घुसून मारहाण ; दुकानाची तोडफोड, दोघांवर गुन्हा दाखल

(फलटण/ प्रतिनिधी ): जिंती नाका परिसरातील एका हेअर कटिंग दुकानात घुसून खंडणी मागत दुकानाची तोडफोड व मारहाण केल्याची गंभीर घटना घडली आहे. याप्रकरणी फलटण शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 19 मे 2026 रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास जिंती नाका येथे “किंग युनिसेक्स पार्लर” या दुकानात दोन इसममोटारसायकलवरून आले. त्यांनी दुकानात घुसून शिवीगाळ करत दहशत निर्माण केली. त्यातील एका इसमाने स्वतःला “अभि भाई” म्हणून ओळख करून देत महिन्याला 10 हजार रुपये हफ्ता देण्याची धमकी दिली. विरोध केल्यास “खल्लास करीन” अशी धमकीही दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

यानंतर आरोपींनी धारदार लोखंडी हत्यार व लोखंडी कड्याने दुकानातील कर्मचाऱ्यांना मारहाण केली. या हल्ल्यात मोहम्मद फरमान मोहम्मद नफीस मलिक आणि अजिम अहमद नसीमअहमद मलिक हे जखमी झाले. आरोपींनी दुकानातील साहित्याची तोडफोड केली तसेच दुकानाबाहेर उभ्या असलेल्या कारच्या काचाही फोडल्याचे सांगण्यात आले.

या प्रकरणी भाई अभिजित जाधव व एका अनोळखी इसमाविरुद्ध बीएनएस कलम 308(5), 118(1), 352, 351(2)(3), 324(4), 3(5) अन्वये खंडणी, दुखापत व दहशत निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्याचा पुढील तपास स.पो.नि. शिंदे हे करीत असून, पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!