आपला जिल्हा
प्रभाग रचना प्रक्रिया सुरू, मे महिन्यात ग्रामपंचायत जाहीर होणार

(फलटण /प्रतिनिधी) जानेवारी ते डिसेंबर 2026 च्या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना प्रक्रियेला प्रशासनाने सुरुवात केली. राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार ही कार्यवाही तातडीने पूर्ण केली जाणार असून मे महिन्याच्या प्रारंभ अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात येणार आहे.
फलटण तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचना प्रक्रियेला प्रशासनाने सुरुवात केली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार ही कार्यवाही तातडीने पूर्ण केली जाणार असून मे महिन्याच्या प्रारंभ अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात येणार आहे.
महत्त्वाच्या तारखा:
– 7 एप्रिल: प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्धी
– एप्रिल: नागरिकांकडून हरकती व सूचना सादर
– 24 एप्रिल: प्रांत अधिकाऱ्यांकडून सुनावणी
– 28 एप्रिल: जिल्हाधिकाऱ्यांकडे अंतिम प्रस्ताव
– 4 मे: राज्य निवडणूक आयोगाकडे सादर
– 4 मे: अंतिम प्रभाग रचना प्रसिद्धीप्रभाग रचना प्रक्रिया:
– गुगल अर्थ नकाशांचे आधारे प्रत्येक गावाच्या नकाशा अंतिम
– तलाठी व ग्रामसेवक यांच्या संयुक्त पाहणीतून प्रभागांची विभागणी व सीमा निश्चित
– तहसीलदारांचे अध्यक्षतेखाली समितीकडून तपासणी



