आपला जिल्हा

संगणकीय व स्पर्धेच्या युगात टिकावयाचे असेल तर जिद्द, संघर्ष, सातत्य व चिकाटी यांची गरज- प्रा. दादासाहेब चोरमले

(फलटण/ प्रतिनिधी) – श्री संत गाडगेबाबा मिशनचे संचालक ह भ प शिंदे महाराज यांच्या माध्यमातून ताथवडे येथे सुरू करण्यात आलेल्या श्री संत गाडगेबाबा माध्यमिक आश्रम शाळेचा परिसर हा निसर्ग रम्य असून या विद्यालयातील विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीचे शिक्षण या ठिकाणी उपलब्ध करून दिले जात आहे या आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना सध्याचं संगणकीय व स्पर्धेच्या युगामध्ये टिकावयाचे असेल तर त्यांच्यामध्ये जिद्द, संघर्ष, सातत्य व चिकाटी या गुणांची गरज असल्याचे प्रतिपादन सातारा जिल्हा ॲम्युचर खो- खो असोसिएशनचे उपाध्यक्ष तथा खोलेश्वर माध्यमिक विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक दादासाहेब चोरमले यांनी केले.

– स्पर्धेच्या युगात जिद्द, संघर्ष, सातत्य व चिकाटीची गरज – प्रा. दादासाहेब चोरमले

ताथवडे आश्रम शाळेत दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी निरोप व शुभेच्छा कार्यक्रम
– थॉमस एडिसन, अब्दुल कलाम यांच्या उदाहरणांसह विद्यार्थ्यांना प्रेरणा
– शिक्षणाला परिस्थिती आड येऊ शकत नाही – दादासाहेब चोरमले
– मोबाईलचा वापर टाळा, जिद्दीने स्वप्न साकार करा – विकास काकडे

प्राध्यापक दादासाहेब चोरमले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना

श्री.संत गाडगेबाबा मिशन संस्था संचलित श्री संत गाडगेबाबा माध्यमिक आश्रम शाळा, ताथवडे ता. फलटण यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या निरोप व शुभेच्छा कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.

याप्रसंगी मुधोजी हायस्कूल व जुनिअर कॉलेजचे माजी प्राचार्य सुधीर अहिवळे फलटण नगरपरिषदेचे नगरसेवक विकास काकडे, ताथवडे गावचे सरपंच दशरथ बोबडे, ताथवडे गावचे माजी उपसरपंच लक्ष्मण तात्या शिंदे, श्री संत गाडगेबाबा मिशनचे संचालक ह. भ. प. शिंदे महाराज, श्री संत गाडगेबाबा माध्यमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक साळुंखे सर, हेमंत शिंदे व दादासाहेब काकडे इत्यादी मान्यंवर याप्रसंगी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पुढे दादासाहेब चोरमले म्हणाले की, थॉमस एडिसन जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ होऊन गेले यांचा इतिहास आपण जर पाहिला तर ते कानाने अधू झालेले होते. शाळेतून गुरुजींनी केवळ तीन महिन्यात थॉमस एडिसनला घरी पाठवले व त्याच्या आईला चिठ्ठी लिहून पाठवली की तुमच्या मुलाला अभ्यासात गती नाही तो शिकू शकणार नाही. मात्र जिद्द, संघर्ष, सातत्य आणि चिकाटी या जोरावर ते जगातील महान शास्त्रज्ञ बनू शकले थॉमस एडिसन यांनी बल्बचा दिवा लावण्यासाठी तब्बल १हजार प्रयोग केले व एक हजार प्रयोगांतर विजेचा बल्ब दिव्याचा शोध लावला तसेच भारताचे माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी लहानपणी वृत्तपत्र विक्रेत्याचा व्यवसाय केला आणि जिद्दीच्या व संघर्षाच्या जोरावर ते भारताचे थोर शास्त्रज्ञ बनले व त्यांची पूर्ण जगामध्ये मिसाईल मॅन म्हणून ओळख तयार झाली तसेच ते भारताचे राष्ट्रपती सुद्धा झाले असल्याचे सांगून दादासाहेब म्हणाले की, शिक्षणाला कधीही परिस्थितीत आड येऊ शकत नाही. त्यासाठी लागते ती फक्त जिद्द व संघर्ष करण्याची तयारी आणि नेमके याच गुणाची गरज आजच्या मुलांच्या मध्ये असणे महत्त्वाचे असून मुलांनी मोठ मोठी स्वप्ने जरूर पहावीत व ती स्वप्न साकार करण्यासाठी आपल्यामध्ये वरील गुणांची तयारी ठेवली तर निश्चित आपले स्वप्न पूर्ण होऊ शकतात असेही त्यांनी शेवटी आपल्या भाषणात सांगितले.

यावेळी बोलताना फलटण नगर परिषदेचे नगर परिषदेचे नगरसेवक विकास काकडे म्हणाले की, अलीकडल्या काळामध्ये मुलींसाठी खूप मोठी संधी प्राप्त झाली असून सर्वच क्षेत्रांमध्ये महिलांसाठी राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत या संधीचा फायदा मुलींनी घेणे गरजेचे असून ग्रामीण भागातील मुलींनी शिक्षणाच्या मोठमोठ्या संधी प्राप्त करून घेण्यासाठी अपडेट राहणे गरजेचे असून संगणकीय युगामध्ये मुलांनी मोबाईलचा वापर टाळणे गरजेचे आहे. मोबाईल हा आपला सर्वात मोठा शत्रू असून आपण आपल्या जीवनातील अनेक तास यासाठी खर्ची घालतो हे निश्चितच धोकादायक असल्याचेही काकडे म्हणाले.

याप्रसंगी मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य सुधीर अहिवळे यांनी आपल्या भाषणात प्रामुख्याने सांगितले की, श्री संत गाडगेबाबा यांनी समाजाला जे दहा संदेश दिले आहेत या संदेशाचे थोड्या प्रमाणात जरी आपण पालन केले तरी देखील आपण या देशातील एक यशस्वी नागरिक बनू शकतो संत गाडगेबाबा यांचे कार्य हे खूप महान कार्य होते खऱ्या अर्थानं त्यांनी समाजातील गरीब, दिन-दलित, वंचित, उपेक्षित, अंध अपंग लोकांसाठी कार्य केले. त्यांच्या कार्याचे या विद्यालयामध्ये शिंदे महाराज यांच्या माध्यमातून मोठे काम होत असल्याचेही ते म्हणाले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रास्ताविकामध्ये विद्यालयाचे मुख्याध्यापक साळुंखे सर यांनी श्री संत गाडगेबाबा यांच्या कार्याचा आढावा घेतला तर श्री. संत गाडगेबाबा मिशनचे संचालक ह. भ. प. शिंदे महाराज यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले

Related Articles

Back to top button
Don`t copy text!