आपला जिल्हा
नवसाला पावणारा, हाकेवर धावणारा जावल सिद्धनाथाची यात्रा ९ एप्रिलपासून सुरू

(जावली / अजिंक्य आढाव) – महाराष्ट्रासह कर्नाटक व मध्यप्रदेश राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान आणि तमाम जनतेचे कुलदैवत म्हणून ओळख असलेली जावल येथील श्री सिद्धनाथांची यात्रा यंदा दि. ९ एप्रिल ते १३ एप्रिल दरम्यान मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. “नवसाला पावणारा, हाकेवर धावणारा” असा लौकिक असलेल्या या यात्रेसाठी दरवर्षी हजारो भाविक उपस्थित राहतात.
यात्रेदरम्यान विविध धार्मिक व पारंपरिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून कार्यक्रमाचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे –
🔸 दि. ९ एप्रिल(गुरुवार)– हळदी 5 ते 8:30 वाजता समारंभ
🔸 दि. १० एप्रिल (शुक्रवार )– विवाह (लग्न) सोहळा दुपारी 12:30 ते 02 ( महाप्रसादाचे आयोजन )
🔸 दि. ११ एप्रिल (शनिवार )– भाकड दिवस
🔸 दि. १२ एप्रिल (रविवार )– बकरी / धडका बगाडे
🔸 दि. १३ एप्रिल (सोमवार )– छबिना व गुलाल सोहळा (पहाटे 4) वाजता पालखी मंदिरातुन निघते
या यात्रेनिमित्त जावली परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार असून भाविकांसाठी विविध सोयी-सुविधांची तयारी करण्यात येत आहे. प्रशासन व ग्रामस्थांच्या वतीनेही यात्रेचे नियोजन करण्यात येत आहे.


