आपला जिल्हा

जावल सिद्धनाथ-जोगेश्वरी विवाह सोहळ्यानिमित्त चवरे परिवाराकडून महाप्रसादाचे आयोजन

(जावली / अजिंक्य आढाव) – सालाबादप्रमाणे यंदाही जावल येथील श्री सिद्धनाथ-जोगेश्वरी विवाह सोहळा दि. १० एप्रिल रोजी रिगवणे येथे मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरा होत आहे. या पारंपरिक सोहळ्याचे औचित्य साधून चवरे परिवाराच्या वतीने भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

या धार्मिक कार्यक्रमासाठी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून, सोहळ्याच्या निमित्ताने गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन चवरे परिवाराकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!