आपला जिल्हा

गॅस होईना बुकिंग कस करणार कूकिंग : गॅस साठी जावलीत रांग

(जावली /अजिंक्य आढाव )जावली (ता. फलटण) परिसरात घरगुती गॅस सिलिंडरच्या टंचाईमुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. गॅस बुकिंग होत नसल्याने अनेक कुटुंबांना स्वयंपाक करण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे.अशातच यात्रा उत्सव असल्याने गावातील नागरिकांनी पाहुणे यात्रेसाठी येणाऱ्या पाहुणे मंडळी साठी घरगुती गॅस घेण्यासाठी धडपड सुरु असल्याचे चित्र दिसत आहे.

ओटीपी असेल तरच सिलेंडर

फलटण गॅस एजन्सीसमोर नागरिकांच्या लांबच लांब रांगा नंतर आता ग्रामीण भागात आता हे चित्र दिसु लागले आहे , अनेकजण तासन्तास प्रतीक्षा करत आहेत. काही नागरिकांनी “बुकिंग होत नाही, तर गॅस मिळणार कसा ?” असा सवाल उपस्थित केला आहे.

विशेषतः महिलांना याचा अधिक त्रास सहन करावा लागत असून, रोजच्या स्वयंपाकासाठी पर्याय शोधावे लागत आहेत. काही ठिकाणी लाकूड किंवा इतर साधनांचा वापर करून स्वयंपाक केला जात असल्याचे चित्र आहे.

दरम्यान, संबंधित गॅस पुरवठा यंत्रणेने लवकरात लवकर परिस्थिती सुरळीत करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन पुरेसा गॅस पुरवठा करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!