आपला जिल्हा

समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त युवा कार्यकर्ते सागर तेली यांच्या वतीने वृद्धाश्रमात फळांचे वाटप

(फलटण/ प्रतिनिधी )- फलटण नगरपरिषदेचे लोकप्रिय नगराध्यक्ष मा. श्री. समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त युवा कार्यकर्ते सागर तेली यांच्या वतीने कुरवली फलटण येथील वृद्धाश्रमामध्ये अनेक फळांचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी फलटण नगर परिषदेचे माजी नगरसेवक अनुप शहा, शकिरभाई शेख व रियाजभाई इनामदार इत्यादी मान्यवर उपस्थित होते.यावेळी बोलताना अनुप शहा म्हणाले की, फलटणचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सागर तेली या कार्यकर्त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत एक चांगला उपक्रम राबविला आहे. यावेळी शहरातील एका वृद्धाश्रमात जाऊन सागर तेली यांनी तेथील ज्येष्ठ नागरिकांना फळांचे वाटप केले.

या उपक्रमाद्वारे कार्यकर्त्यांनी आनंदाचा क्षण वृद्धांबरोबर साजरा केला. ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या आरोग्याची विचारपूस करण्यात आली. तसेच त्यांना आवश्यक असलेल्या सुविधांबाबतही माहिती घेण्यात आली.

नगराध्यक्षांच्या वाढदिवसानिमित्त केवळ उत्सव न साजरा करता समाजासाठी काहीतरी देण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. वृद्धाश्रमातील रहिवाशांनीही या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत कार्यकर्त्यांचे आभार मानले.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!