आपला जिल्हा

डॉ. प्रसाद जोशी यांना “उषा-वैभव” पुरस्कार जाहीर

(जावली /अजिंक्य आढाव )– फलटण शहरातील सुप्रसिद्ध वैद्यकीय तज्ञ डॉ. प्रसाद जोशी यांची यंदाच्या प्रतिष्ठेच्या “उषा-वैभव” पुरस्कारासाठी निवड जाहीर करण्यात आली आहे. त्यांच्या वैद्यकीय सेवेसह सामाजिक कार्याची दखल घेत हा सन्मान प्रदान केला जात आहे.

हा पुरस्कार सोहळा दिनांक ५ एप्रिल २०२६ रोजी संध्याकाळी सजाई गार्डन, फलटण येथे मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. या वेळी माननीय उषा मंगेशकर यांच्या हस्ते डॉ. जोशी यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

सोहळ्यास प्रसिद्ध अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे तसेच प्रख्यात पत्रकार प्रसन्न जोशी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

“उषा-वैभव” पुरस्कार यापूर्वी रमेश देव, प्रतीक्षा लोणकर, मोहन आगाशे, प्रभाकर जोग, शांताराम नांदगावकर, तेजस्विनी सावंत, जुही चावला यांसारख्या दिग्गजांना देण्यात आला आहे.

या निमित्ताने अनुबंध कला मंडळ यांच्या वतीने ‘Magical RD Night’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रम विनामूल्य असून प्रवेशिका आवश्यक आहेत.

तरी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सोहळ्याची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!