आपला जिल्हा

जावली (ता. फलटण) येथे डोंगराला भीषण आग ; शेतशिवार जळून खाक, चाऱ्याचा प्रश्न तीव्र — दोषींवर कठोर कारवाईची मागणी

(जावली /अजिंक्य आढाव )जावली (ता. फलटण) परिसरात दुपारच्या सुमारास अज्ञात व्यक्तीकडून लावण्यात आलेल्या आगीमुळे डोंगराला भीषण आग लागली. या आगीत मोठ्या प्रमाणावर शेतशिवार जळून खाक झाले असून संपूर्ण डोंगर परिसर होरपळून निघाला आहे.

 कडळीची टेक असा शेतशिवराला नाव असल्याने या डोंगरावरती अनेक शेतकरी आपला जनावरांना चाऱ्यासाठी घेऊन येतात मात्र डोंगरावरचे गवत जळाल्याने चाऱ्याचा प्रश्न अधिक तीव्र होत गेला आहे

या घटनेमुळे परिसरातील गवत, झुडपे आणि नैसर्गिक चारा पूर्णतः नष्ट झाला आहे. परिणामी ऐन उन्हाळ्याच्या तोंडावरच जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून शेतकरी मोठ्या चिंतेत सापडले आहेत.

आग विझवण्यासाठी स्थानिक नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र आगीचा वेग प्रचंड असल्याने नुकसान टाळता आले नाही. या घटनेमुळे पर्यावरणाचेही मोठे नुकसान झाले आहे.

दरम्यान, प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी पाहणी करून पंचनामा करावा तसेच वणवा लावणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी संतप्त नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!