आपला जिल्हा
जावलीत बिबट्याचा धुमाकूळ ; गोफणे मळ्यात दोन पाळीव कुत्र्यांचा बळी, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

(जावली/अजिंक्य आढाव ) जावली ता फलटण येथील गोफणे मळा परिसरात बिबट्याने पुन्हा शिरकाव करत दोन पाळीव कुत्र्यांचा बळी घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उद्धव गोफणे आणि बबन गोफणे यांचे पाळीव कुत्रे बिबट्याने फस्त केल्याने परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वनविभागाला जाग कधी येणार..!
गेल्या काही दिवसापासून बिबट्या चा वावर होत असताना विन विभाग कोणतिही ॲक्शन घेत नसल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.



