आपला जिल्हा

तडीपार आरोपी पुन्हा शहरात ; फलटण पोलिसांची झटपट कारवाई, गजानन चौकातून अटक

फलटण (प्रतिनिधी) : शहरात दहशत माजवणाऱ्या तडीपार गुन्हेगाराला फलटण शहर पोलिसांनी चोख सापळा रचून जेरबंद केले आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी गजानन चौक परिसरात कारवाई करत आरोपीला अटक केली.

दिनांक २६ एप्रिल २०२६ रोजी फलटण शहर पोलीस ठाण्याचे सहा पोलीस निरीक्षक नितीन नन, श्रेणी उपनिरीक्षक भोसले, सपोनि बोचरे, पोहेवा संतोष नाईक, पोहेका अतुल बडे व पोहेका जिंदर टिंके हे पेट्रोलिंग करत असताना आरोपी शहरात फिरत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. तत्काळ पथकाने गजानन चौक येथे धाड टाकून आरोपीला ताब्यात घेतले.

सदर आरोपी हा सातारा, पुणे (बारामती व पुरंदर) तसेच सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात मागील दोन वर्षांपासून तडीपार होता. तरीही तो फलटण शहरात बेकायदेशीरपणे वावरत असल्याचे निष्पन्न झाले. आरोपीचे नाव तौफीक उर्फ छोट्या अब्दुल शेख (वय ३२, रा. गोविंद पेठ, गजानन चौक, फलटण) असे आहे.

पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १४२ अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक समीर पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. फलटण शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अरविंद कळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही धडाकेबाज कामगिरी बजावली.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!