आपला जिल्हा

धाडसी तरुणाची शौर्यगाथा : मृत्यूच्या दाढेतून दोघांना वाचवले..! बरड जिल्हा परिषद गटाच्या सदस्या वैशाली कांबळे यांनी केला तरुणांचा सत्कार

(जावली/ अजिंक्य आढाव )फलटण तालुक्यातील निरा उजवा कालव्यात घडलेली एक थरारक घटना सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. राजे गटाचे कट्टर निष्ठावंत व प्रामाणिक कार्यकर्ते श्री. गोविंद दिलीपराव बोडरे उर्फ बंडू यांनी अतुलनीय धाडस दाखवत दोन नागरिकांचे प्राण वाचवले.

मिळालेल्या माहितीनुसार, कालव्यातून जात असलेली गाडी अचानक पाण्यात बुडू लागली. परिस्थिती अत्यंत गंभीर होती आणि वेळ अत्यल्प होता. अशा वेळी क्षणाचाही विलंब न करता बंडू बोडरे यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालत थेट पाण्यात उडी घेतली. त्यांनी प्रसंगावधान राखत आणि कौशल्याने गाडीत अडकलेल्या दोघांना बाहेर काढले. त्यानंतर स्वतः पोहत त्यांना सुरक्षित किनाऱ्यावर आणून त्यांचे प्राण वाचवले.

या शौर्यपूर्ण कामगिरीमुळे परिसरात बोडरे यांचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या बरड गटाच्या विद्यमान सदस्या सौ. वैशाली संदीप कांबळे यांनी त्यांचे विशेष अभिनंदन करत कृतज्ञता व्यक्त केली.

तसेच, या प्रसंगी मा. श्री. मारुती सांगळे (संचालक, श्रीराम सहकारी साखर कारखाना, फलटण)श्री. संदीप कांबळे (केंद्रप्रमुख, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, सातारा)उदय बागाव,अमोल बागावयांनीही बोडरे यांच्या धाडसाचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!