आपला जिल्हा

जावल सिद्धनाथ मंदिरात अंकुश जाधव यांची भेट ; रामोशी समाजाच्या अडचणी सोडवण्याचे आश्वासन

(जावली/ अजिंक्य आढाव )फलटण तालुक्यातील जावल येथील प्रसिद्ध सिद्धनाथ मंदिरात जय मल्हार क्रांती सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अंकुश जाधव यांनी भेट देऊन सिद्धनाथांचे दर्शन घेतले. अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून ओळख असलेल्या या मंदिरात त्यांनी भाविक भावनेने पूजा केली.

यावेळी मंदिरातील पुजारी मंडळींनी त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. स्थानिकांशी संवाद साधताना अंकुश जाधव यांनी रामोशी समाजाच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी आवश्यक ती मदत करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

या वेळी मंदिरातील सेवेकरी बजरंग पवार, शिवाजी कुलकर्णी,तानजी गुरव, जावली ग्रामस्थ अमित बुधावले आदी उपस्थित होते या भेटीमुळे परिसरात समाधानाचे वातावरण असून सामाजिक प्रश्नांकडे लक्ष देण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!