आपला जिल्हा

जावली ग्रामपंचायत निवडणूक : थेट सरपंचपदासाठी माजी उपसरपंच दादासाहेब ठोंबरे इच्छुक ; पक्षाकडून संधी मिळाल्यास रिंगणात उतरणार..!

(जावली / अजिंक्य आढाव)जावली ग्रामपंचायतीच्या आगामी निवडणुकीची राजकीय रंगत वाढू लागली असून थेट सरपंच पदासाठी माजी उपसरपंच दादासाहेब ठोंबरे यांनी आपली उमेदवारी जाहीर करण्याचे संकेत दिले आहेत. पक्षाने पुन्हा एकदा संधी दिल्यास आपण निवडणूक लढवणार असल्याचे ठोंबरे यांनी स्पष्ट केले.

 पक्षश्रेष्ठींच्या शब्दाला किंमत देणार..!

 पक्षातील गटांतर्गत कलह निर्माण झाल्यास तो शांततेच्या मार्गाने सोडवण्याला प्राधान्य देणार, असेही त्यांनी स्पष्ट केले. विकासाच्या मुद्द्यावर सर्वांना एकत्र घेऊन काम करण्याची भूमिका त्यांनी मांडली.

गेल्या कार्यकाळात उपसरपंच म्हणून काम करताना गावातील पाणीपुरवठा, अंतर्गत रस्ते, स्वच्छता मोहिम तसेच विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न केल्याचा दावा त्यांनी केला. अपूर्ण विकासकामे पूर्ण करण्यासाठी आणि गावाच्या सर्वांगीण विकासासाठी थेट सरपंच म्हणून काम करण्याची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले.

जावली ग्रामपंचायतीत सध्या राजकीय घडामोडींना वेग आला असून विविध गटांकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. ठोंबरे यांच्या भूमिकेमुळे निवडणुकीत चुरस निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

दरम्यान, पक्षश्रेष्ठींचा निर्णय अंतिम असणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. गावाच्या विकासासाठी सर्वसामान्य नागरिकांचा पाठिंबा मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!