आपला जिल्हा

शाळा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न ; नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत

(जावली/ अजिंक्य आढाव ): शाळा प्रवेशोत्सवानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बरड येथे नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. बरड जिल्हा परिषद गटाच्या सदस्या मा. सौ. वैशालीताई कांबळे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ व शैक्षणिक साहित्य देऊन स्वागत करण्यात आले.

या कार्यक्रमास बरड गावचे प्रथम नागरिक सरपंच मा. श्री. प्रकाश लंगुटेशाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा. श्री. तुकाराम गावडे तसेच समितीचे सदस्य उपस्थित होते. यावेळी वैशालीताई कांबळे यांनी शाळेच्या शैक्षणिक व प्रशासकीय कामकाजाबाबत समाधान व्यक्त करत शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

कार्यक्रमाला बरड गावातील पालक, ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी गावातील सामाजिक कार्यकर्ते मा. श्री. दत्ता टेंबरे यांनी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून प्रवेशोत्सवाचा आनंद द्विगुणित केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन मुख्याध्यापक श्री. उदयकुमार नाळे यांनी केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. ढगे सर यांनी केले.शाळेत नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत होत असल्याने पालक व विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!