आपला जिल्हा
वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकीची जपणूक ; शिवसेनेच्या वतीने विविध उपक्रम संपन्न
संजयजी मोरे व शरदजी कणसे यांना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्याकडून शुभेच्छा

(फलटण/ प्रतिनिधी) -शिवसेना पक्षाचे राज्य सचिव संजयजी मोरे आणि सातारा जिल्हा संपर्कप्रमुख शरदजी कणसे यांच्या वाढदिवसानिमित्त फलटण शहर व तालुका शिवसेना पक्षाच्या वतीने फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघात विविध सामाजिक उपक्रमांचे उत्साहात आयोजन करण्यात आले. वाढदिवसाचे औचित्य साधत समाजोपयोगी कार्यक्रमांद्वारे सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश देण्यात आला.
सकाळी तेली गल्ली येथील श्री शंभू महादेव मंदिरात दुग्धाभिषेक करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर फलटण उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळे व बिस्किटांचे वाटप करण्यात आले. शहर व तालुका पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा उपक्रम पार पडला.
कुरवली येथील ओंकार वृद्धाश्रमातही वृद्धांना फळे व आम्रखंडाचे वितरण करण्यात आले. तसेच महात्मा शिक्षण संस्था संचलित मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्यात आला.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीव राजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याच वेळी दिव्यांग मुलांसाठी कान, नाक व घसा तपासणी शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. फलटण येथील प्रसिद्ध तज्ञ डॉ. जनार्दन पिसाळ यांनी सुमारे ४० विद्यार्थ्यांची मोफत तपासणी करून सामाजिक कर्तव्य पार पाडले.
यावेळी बोलताना संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी संजयजी मोरे व शरदजी कणसे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देत, “वाढदिवस हा केवळ उत्सव नसून समाजासाठी काहीतरी देण्याची संधी आहे,” असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमास स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या या उपक्रमांमुळे सामाजिक जाणीवेचा आदर्श निर्माण झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
यावेळी सातारा जिल्हा शिवसेना समन्वयक विराज खराडे, तालुकाप्रमुख नानासाहेब इवरे, शिवसेना शहर प्रमुख निलेश तेलखडे, सातारा जिल्हा ॲम्युच्युअर खो-खो असोसिएशनचे उपाध्यक्ष दादासाहेब चोरमले, फलटण नगर परिषदेचे नगरसेवक विकास काकडे, मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य सुधीर अहिवळे, नगरसेवक विशाल तेली

फलटण नगर परिषदेच्या नगरसेविका सौ. सारिका मदने, नगरसेविका सौ स्मिता शहा, शिवसेनेचे नेते ज्ञानेश्वर पवार, शिवसेनेचे विजय मायने, शिवसेना महिला आघाडी प्रमुख सौ. नंदिनी गायकवाड, पत्रकार शक्ती भोसले
पांडुरंग अहिवळे, किशोर तारळकर, अमरसिंह खानविलकर, सिकंदर डांगे यश शिंदे, विकी काकडे, प्रविण काकडे (सर), गणेश भोईटे, विजयकुमार निंबाळकर इत्यादी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.



