आपला जिल्हा

12 लाख किमतीचे 40 मोबाईल मूळ मालकांना फलटण शहर पोलिसांनी केले परत

(फलटण /प्रतिनिधी) : सातारा जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये सी.ई.आय.आर. पोर्टलच्या माध्यमातून हरवलेले मोबाईल शोधण्याची मोहीम सुरू असून, फलटण शहर पोलीस ठाण्याला यामध्ये मोठे यश मिळाले आहे. तब्बल १२ लाख रुपये किमतीचे ४० हरवलेले मोबाईल शोधून ते मूळ मालकांना परत करण्यात आले आहेत.

मा. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे व मा. अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या सूचनेनुसार फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.

सी.ई.आय.आर. पोर्टलच्या सहाय्याने तांत्रिक विश्लेषण करून कर्नाटक, उत्तर प्रदेश, गुजरात, तेलंगणा तसेच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून हे मोबाईल शोधण्यात आले. पोलिसांनी अथक प्रयत्न करून संबंधित मोबाईल हस्तगत केले व नागरिकांना परत सुपूर्द केले.

आज फलटण शहर पोलीस ठाण्यात आयोजित कार्यक्रमात उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे, तहसीलदार अभिजीत जावेद, पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांच्या हस्ते नागरिकांना मोबाईल परत देण्यात आले. मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत पोलीस प्रशासनाचे आभार मानले.

सन २०२५ पासून आतापर्यंत फलटण शहर पोलीस ठाण्याकडून एकूण ४५५ हरवलेले मोबाईल मूळ मालकांना परत करण्यात आले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

यावेळी महिला पोलीस उपनिरीक्षक अयोध्या घोरपडे तसेच पोलीस अंमलदार स्वप्नील खराडे, राणी फाकडे, महेश जगदाळे, जितेंद्र ठिके, मुकेश घोरपडे, अतुल बडे आदींनी मोहिमेत सहभाग घेतला

Related Articles

Back to top button
Don`t copy text!