आपला जिल्हा

महाशिवराञ निमित्ताने विडणी येथिल उत्तरेश्वर मंदीरात भाविकांना एक टन शाबु वड्याचे वाटप

(विडणी/ प्रतिनिधी)- विडणी येथिल पांडवकालीन पुरातन उत्तरेश्वर मंदीर पंचक्रोशीत भाविक भक्तांचे श्रध्दास्थान आहे. महाशिवराञ निमित्ताने मंदीरात दोन तीन दिवस धार्मिक कार्यक्रम सुरु असतात. दर्शनासाठी राञभर मंदीर खुले असते.

शाबु वड्याचे वाटप:

– गावातील दानशूर व्यक्ती आपल्या नावाची प्रसिद्धी न करता महाशिवराञ निमित्ताने मंदीरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांना सकाळ पासून राञी किर्तन सेवा सुरु होईपर्यंत उपहासाचे शाबुवडे जवळपास एक टन भाविकांना वाटप करणेत आला.

शाबुवडे तयार करणेसाठी लागलेले साहित्य:

– बटाटे: ५०० किलो
– शाबुदाना: २६० किलो
– शेगदाणे: १२५ किलो
– दही: १२५ लीटर
– तेल: १० डबे
– साखर: १०० किलो
– हिरवी मिरची: २५ किलो.
– – उत्तरेश्वर मंदीर विडणी येथिल पांडवकालीन पुरातन उत्तरेश्वर मंदीरात महाशिवराञ निमित्ताने कार्यक्रम

महाशिवराञ निमित्ताने विडणी येथिल उत्तरेश्वर मंदीरात धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

 श्रींची आरती: सकाळी ७ वा.

– भजनाचा हरिनाम जागर कार्यक्रम: सकाळी ११ ते ५ वाजेपर्यंत
– श्रींची आरती: सायंकाळी ७वा.
– हभप बाळासाहेब गाडेकर महाराज यांचे किर्तन: सायंकाळी १०वा.
– लघुरुद्राभिषेक: सायंकाळी ११वा.
– बेल पुष्पवृष्टी अभिषेक: सायंकाळी १२.२८वा.
– होमहवन: सायंकाळी १वा.

सोमवार, दि. १६:

– शिवलीला पारायण समाप्ती: सकाळी ८वा.
– महाप्रसादाचा कार्यक्रम

आवाहन:

विडणी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे महाशिवराञ उत्सव समितीच्या वतीने आवाहन करणेत आले आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!