आपला जिल्हा
विडणीतील सुजाता किशोर(टिळेकर)अभंग तालुका कृषि अधिकारी पदी निवड

(विडणी/ प्रतिनिधी )- विडणी येथील सुजाता किशोर(टिळेकर)अभंग तालुका कृषि अधिकारी पदी निवड महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये त्यांची तालुका कृषी अधिकारी या पदी निवड झाली आहे.
स्पर्धा परिक्षा देण्याचे पहिल्या पासून निश्चय होता.सासर माहेर विडणीच असल्याने कुटुंबा कडून पाठींबा मिळाला.तसेच पती किशोर अभंग यांची मोलाची साथ मिळाल्याने मी यश मिळवू शकले असल्याचे सुजाता अभंग (टिळेकर) त्यांनी मत व्यक्त केले.
त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा विडणी,माध्यमिक शिक्षण शांतिनिकेतन सांगली. उच्य माध्यमिक शिक्षण मालोजीराजे शेती शाळा फलटण व उच्य शिक्षण हे राजश्री छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय कोल्हापूर येथून कृषी कीटकशास्त्र या विषयात झालेले आहे.
त्यांचे शिक्षण:
प्राथमिक शिक्षण: जिल्हा परिषद शाळा विडणी
– माध्यमिक शिक्षण: शांतिनिकेतन सांगली
– उच्य माध्यमिक शिक्षण: मालोजीराजे शेती शाळा फलटण
– उच्य शिक्षण: राजश्री छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय कोल्हापूर (कृषी कीटकशास्त्र)2024 पासून स्पर्धा परीक्षेची तयारी
– जावली तालुका येथे कृषि सहाय्यक पदावर कार्यरत आहेत
– स्पर्धा परिक्षेत दुसऱ्या प्रयत्नात तालुका कृषि अधिकारी पदी यश संपादन केलेत्यांचे अभ्यास विषयक मत:
“स्पर्धा परिक्षा देण्याचे पहिल्या पासून निश्चय होता. सासर माहेर विडणीच असल्याने कुटुंबा कडून पाठींबा मिळाला. तसेच पती किशोर अभंग यांची मोलाची साथ मिळाल्याने मी यश मिळवू शकले.”



