आपला जिल्हा
दहावीची परिक्षा ही अंतिम परिक्षा नसून मुलांना पुढे घेऊन आयुष्याला दिशा देणारा राजमार्ग प्रा.रवींद्र कोकरे

(फलटण/ प्रतिनिधी)- दहावीची परिक्षा ही अंतिम परिक्षा नसून मुलांना पुढे घेऊन आयुष्याला दिशा देणारा राजमार्ग असल्याचे प्रा.रविंद्र कोकरे यांनी मत व्यक्त केले.
प्रा.रविंद्र कोकरे यांच्या मार्गदर्शनाबद्दल माहिती
– दहावीची परिक्षा ही अंतिम परिक्षा नसून आयुष्याला दिशा देणारा राजमार्ग आहे.
– स्वताः ला कमी समजू नका, प्रत्येका मध्ये अदृश्य शक्ती दडलेली असते.
– परस्थितीशी दोन हात करायला शिका.
– सतत २४ तास अभ्यास करणे गरजेचे नाही.
– चितन मनन लेखन वाचन करत मनात जिद्द ठेवा.– प्रसार माध्यमाच आकर्षण मुळे युवा वर्ग बिघडत चालला आहे अशा गोष्टींचा त्याग करायला शिका.
– तुम्ही अस काही करा की दुनिया तुमच्या माग धावली पाहीजे.
– तुम्हची किंमत बाह्य रंगावून नाही तर अंतरंगा वरुन दिसायला हवी.
– आई वडील शिक्षक आपले शाश्वत मार्गदर्शक दैवत आहेत. त्यांना कमी पणा येईल असे न वागता स्वताःचे चरिञ व चारित्र्य जपा.



