(जावली /अजिंक्य आढाव)- नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद गटाच्या सदस्या सौ वैशाली ताईनी जावली गावाला भेट देऊन मतदार बंधू आणि भगिनींचे आभार व्यक्त केले.
निंबळक तालुका फलटण येथील रहिवासी असलेल्या सौ वैशालीताई कांबळे या सामाजिककार्या बरोबरच मालोजीराजे शेती विद्यालयात उपक्रमशील शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.”जनतेने मतांच्या स्वरूपातील विश्वास प्रामाणिकपणे कामाच्या माध्यमातून परत करेन”
शिक्षण,महिला सबलीकरण आणि ग्रामविकास क्षेत्रात काम प्रामाणिकपणे करेन अशा शब्द नागरिकांना दिला.या वेळी गावतील तरुण नेतृत्व अभिजित मकर, संग्राम बरकडे, समीर आतार, राहुल निंबाळकर, जेष्ठ नेते श्रीरंग निंबाळकर, आनंदराव निंबाळकर, सयाजी बरकडे उपस्थित आणि सत्कार करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.