आपला जिल्हा
चिमणराव कदम साहेब यांची पुण्याई व राजे गटाची साथ यामुळेच माझा विजय – युवा नेते सह्याद्री कदम

(फलटण /प्रतिनिधी)- नुकतेच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक निकाल जाहीर करण्यात आले. यामध्ये कोळकी जिल्हा परिषद गटामधून युवा नेते सह्याद्री चिमराव कदम यांनी शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडणूक लढविली होती. यामध्ये त्यांनी जवळपास ३ हजार मताच्या मताधिक्याने भाजपाचे जयकुमार शिंदे यांचा पराभव करून ते निवडून आले आहेत.
सह्याद्री कदम यांच्या विजयाबद्दल आमच्या प्रतिनिधीने त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता ते म्हणाले की, मला जो काही कोळकी जिल्हा परिषद गटामधून विजय मिळाला आहे तो विजय त्यांनी या तालुक्याचे माजी आमदार चिमणरावजी कदम यांच्या पुण्याई मुळे मिळाला असून हा विजय त्यांच्या चरणी अर्पण करतो असे सांगून ते म्हणतात माझ्या विजयात खऱ्या अर्थाने महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे ना. निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे ना. निंबाळकर, श्रीमंत रघुनाथराजे ना. निंबाळकर तसेच राजे गटाच्या कार्यकर्त्यांचा महत्त्वाचा सहभाग असून विशेष करून माझ्या विजयासाठी कोळकी जिल्हा परिषद गटामध्ये श्रीमंत सौ. शिवांजलीराजे ना. निंबाळकर यांचा महत्त्वाचा वाटा राहिला असून त्यांचेही सह्याद्री कदम यांनी विशेष आभार मानले आहेत.
यावेळी पुढे बोलताना सह्याद्री कदम म्हणाले ऐनवेळी मी शिवसेनेत प्रवेश करून देखील माझ्यावर श्रीमंत संजीवराजे यांनी जो विश्वास दाखवला व मला उमेदवारी दिली व माझ्या विजयासाठी विशेष प्रयत्न केले.
त्याबद्दल त्यांनी श्रीमंत संजीवराजे व श्रीमंत सौ शिवांजलीराजे यांचे विशेष आभार सह्याद्री कदम यांनी मानले आहेत.



