आपला जिल्हा
जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांचा उद्या निकाल : राजेगट (शिवसेना) सत्ता राखणार कि नव्या समीकरणाचा उदय होणार.?

(जावली /अजिंक्य आढाव )- फलटण तालुक्यातील 8 जिल्हा परिषद गट व 16 गण यांचा उद्या निकाल जाहिर होणार असुन राजे गट विरुद्ध खासदार गट यांच्यात प्रामुख्याने मोठी लढत पाहायला मिळाली.जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या मतदानामुळे संपूर्ण तालुक्यातील राजकीय वातावरण तापले आहे. दोन्ही प्रमुख गटांचे राजकीय भवितव्य आता मतपेटीत बंद झाले असून, उद्या लागणाऱ्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मतदानानंतर उमेदवारांची घालमेल वाढली असून, कार्यकर्ते आणि नेते गाव गावातुन निकालाबाबत वेगवेगळे अंदाज व्यक्त करत आहेत.मताची बेरीज करणे काही गावाची ग्रामपंचायत मुदत संपत आल्याने बैठक बोलवुन वॉर्डात मता विषयक आकडेवारी काढणे यातुनच कुणाच्या गळ्यात यशाची माळ पडणार आणि कुणाला पराभवाची धूळ चाखावी लागणार, हे उद्या स्पष्ट होणार आहे.
जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक निकाल फेरी




