आपला जिल्हा

बरड जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाचा शिवसेना उमेदवार यांचा बरड येथील हनुमान मंदिरातून श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ

(जावली /अजिंक्य आढाव )- शिवसेनेचे  बरड जिल्हा परिषद गटाचे उमेदवार सौ. वैशालीताई संदीप कांबळे व बरड पंचायत समिती गणाच्या उमेदवार सौ. स्वाती हनुमंत आटोळे यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज बरड हनुमान मंदिरातुन सुरू करण्यात आला.

वैशाली कांबळे – श्रीमंत रामराजे ना. निंबाळकर, संजीवराजे ना. निंबाळकर यांनी तालुक्यात हरित क्रांती, धवल क्रांती, मुलांना चांगल्या प्रकारच्या शैक्षणिक वाटचालीसाठी इंजिनिअरिंग कॉलेज, एग्रीकल्चर कॉलेज, नर्सिंग कॉलेज, एम. बी.ए. कॉलेज, बी फार्मसी व बी.सी.एस. इत्यादी कॉलेजच्या माध्यमातून शैक्षणिक क्रांती केली.

माजी आमदार दिपक चव्हाण शुभारंभ प्रसंगी बोलताना म्हणाले की – फलटणची जलक्रांती श्रीमंत रामराजे नाईक यांनी केली विरोधक फक्त श्रेय घेण्याचे काम करत आहेत.

आता आमचे विरोधक पाण्यासाठी टाहो फोडतात पण खर्‍या अर्थाने शेतकर्‍यांना पाणी मिळावे व शेतकरी, शेतमजूर सुखी व्हावा म्हणून धोम-बलकवडी धरणाची संकल्पना मनात धरून निरा- देवधर व धोम बलकवडी धरणाची मी निर्मिती केली. माझं तरूण पिढीला एकच म्हणणं आहे मोबाईल नंतर बघा, वेळात वेळ काढा.मोटारसायकलवरील जावा, -बलकवडीच्या बोगद्यापासून तुमच्या गावापर्यंत या व पाणी कुणी आणलं ते ठरवा, असे आवाहन करत माजी आमदार दिपक चव्हाण यांनी विरोधकांना ललकारले.

या शुभारंभ प्रसंगी माजी आमदार दिपकराव चव्हाण,धनंजय पवार, सांगळे आण्णा, शंभूराज नाईक निंबाळकर, जयकुमार इंगळे, प्रकाश लंगुटे, प्रभाकर लंगुटे, आण्णा जाधव, आप्पासाहेब वाघमोडे, बाळासो येवले, विनोद शेठ सांगळे, मालोजी येडे, रमेश पवार, सचिन वाघमोडे, रोहित वाघमोडे, बापुराव ठणके, श्रीकांत कदम, कुंडलिक कदम, दुर्योधन इंगळे, दादासो कदम, लालासाहेब रणदिवे, सुभाष झेंडे, पोपट हगारे, टेंबरे, काशीद, लोंढे, लंगुटे, गावडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!