ताज्या घडामोडी
फलटणच्या राजकारणात अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फक्त पाठीमागून आधार देण्या पुरता राहिला आहे का ?
(फलटण/प्रतिनिधी) – फलटणच्या राजकारणात अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फक्त पाठीमागून आधार देण्या पुरता राहिला आहे का?अशी चर्चा नागरिकांमधून दबक्या आवाजात होत आहे.
मग आमदार सचिन कांबळे पाटील यांना आपल्या पक्षाच्या अस्तित्वासाठी लढता येत नाही का ? कि पक्षातील कार्यकर्त्यांनी फक्त भाजपचाच प्रचार करायचा फक्त आमदारकी पुरता राष्ट्रवादीचा वापर केला आहे का ?असे अनेक प्रश्न सध्या जनतेतून विचारले जात आहेत. मूळ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना कधी संधी मिळणार, कि त्यांनी फक्त भाजपलाच आधार द्यायचा अशी चर्चा आता निष्ठावंताकडून होताना दिसत आहे.




