आपला जिल्हा

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपा निष्ठावंतांचा गेम..?

फलटण तालुका भाजपा अध्यक्ष अमित रणवरे यांचा बंडखोरी करून उमेदवारी अर्ज दाखल

(फलटण/ प्रतिनिधी )- फलटण तालुक्यात भारतीय जनता पक्षाने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर अनेकांचे पक्ष प्रवेश मोठ्या धुमधडाक्यात करून घेतले.

हे पक्षप्रवेश करून घेत असताना जुने जाणते ज्यांनी भारतीय जनता पक्षासाठी सुरुवातीपासून कष्ट उपसले आहेत हे कधी बाजूला पडले हे पक्ष नेतृत्वाला देखील समजले नाही.नुकतीच जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी अनेक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने भाजपाकडे उमेदवारी मागितली होती.

यामध्ये प्रामुख्याने फलटण तालुका भाजपाचे अध्यक्ष अमित रणवरे यांनी देखील सुरवडी गणामधून पंचायत समितीसाठी उमेदवारी मागितली होती. मात्र तालुका अध्यक्ष असताना देखील त्यांना उमेदवारी नाकारली गेली याची सर्वांना आश्चर्य वाटत आहे कारण अमित् रणवरे यांनी माजी खासदार हिंदुरावजी नाईक निंबाळकर यांच्या बरोबर काही काळ काम केले आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जात आहेत तसेच भाजप पक्ष वाढीसाठी त्यांनी गेली पाच वर्षे चांगले काम केले असून सातत्याने रस्त्यावर संघर्ष करणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची सर्वसामान्य लोकांमध्ये ओळख आहे. सातत्याने पक्षासाठी व आपल्या नेत्यासाठी रस्त्यावरून येऊन विरोधकाशी दोन हात करण्यास ही रणवरे कधी कमी पडले नाहीत.

अशा एका निष्ठावंत तालुकाध्यक्ष कार्यकर्त्यालाच पंचायत समितीची उमेदवारी मिळत नसेल तर बाकीच्यांची काय गत शेवटी अमित रणवरे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. ते शेवटपर्यंत निवडणुकीच्या रिंगणात राहणार की, उमेदवारी अर्ज मागे घेणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे..?

Related Articles

Back to top button
Don`t copy text!