ताज्या घडामोडी

फलटण नगरपरिषदेच्या स्वीकृत नगरसेवक व उपनगराध्यक्ष पदाच्या निवड

पहा स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडी वरती काय म्हणाले अनिकेतराजे...

(फलटण/ प्रतिनिधी) : फलटण नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडी जाहीर झाल्या.

उपनगराध्यक्ष पदी भाजपच्या नगरसेविका सौ. प्रियदर्शनी रणजितसिंह भोसले यांची बिनविरोध निवड झाली, व शिवसेनेच्या स्वीकृत नगरसेवक पदी ऍडव्होकेट श्रीमंत अनिकेतराजे रामराजे नाईक निंबाळकर यांची बिनविरोध निवड झाली व भाजपच्या स्वीकृत पदी श्री सुदाम अप्पा मांढरे व खासदार गटाचे कट्टर व निष्ठावंत असलेले श्री अशोकराव जाधव या दोघांची देखील बिनविरोध निवड झाली.

स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडी वरती काय म्हणाले अनिकेतराजे सर्व सामान्य जनतेच्या न्याय, हक्कासाठी व त्यांची कामे वेळेत प्रशासनाकडून करून घेण्यासाठी त्यांनी हा पदभार स्वीकारला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की मी माझ्या मागील काळात वकील म्हणून प्रोफेशनल प्रक्टिस केलेल्या कामाचा अनुभव घेऊन पुढील काळात जनतेसाठी काम करण्यास कटिबद्ध आहे आणि जनतेसाठी त्यांच्या हक्कासाठी त्यांच्या सोबत कायम उभा आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!