(आसू /आनंद पवार) फलटणच्या पूर्व भागात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने गुणवरे जिल्हा परिषद गटात युवा उमेदवार ऋतुजा अभिजीत जगताप यांना उमेदवारी मिळाल्याने सर्वसामान्यांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
गुणवरे जिल्हा परिषद गटात अनुसूचित जाती जमातीचे आरक्षण जाहीर झाले असून येथून ऋतुजा अभिजीत जगताप यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून उमेदवारी मिळाल्याने सर्वसामान्य घरातील उमेदवार दिल्याने त्यांची चांगलीच चर्चा गुणावरे जिल्हा परिषद गटात पाहायला मिळत आहे.
या भागात माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आमदार सचिनदादा पाटील जिल्हा बँके चे संचालक व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर, युवा नेते मनोज तात्या गावडे यांच्या माध्यमातून आसू , व गुणावरे गणात केलेली विकास कामे व कोट्यावधींची विकास कामे माहितीच्या माध्यमातून सुरू असून या भागात ऋतुजा जगताप यांचे पारडे सध्या तरी जड वाटत असून त्या सर्वसामान्य घरातील उमेदवार असून त्यांचे पती अभिजीत जगताप हे गोखळी ग्रामपंचायतचे उपसरपंच असून उपसरपंच पदाच्या काळात त्यांनी गोखळी गावात दिलेलं योगदान त्याचबरोबर सर्वांच्या सुख दुःखात सामील होऊन विविध सामाजिक उपक्रमांसाठी केलेली आर्थिक मदत व विविध सामाजिक उपक्रमात घेतलेला सहभाग सर्वांशी मनमिळाऊ व्यक्तिमत्व म्हणून अभिजीत जगताप यांची ओळख आहे.
ऋतुजा अभिजीत जगताप या गोखळी गावच्या असून त्या बाहेर कोठेही नोकरी निमित्त किंवा व्यवसाय निमित्त राहत नाहीत मात्र त्या गोखळी येथेच स्थायिक असल्याने या भागाला हक्काचा स्थानिक उमेदवार मिळाल्याने त्याचबरोबर त्या पक्षाची एकनिष्ठ असल्याने त्यांच्यावरती या भागातील मतदारांचा विश्वास असल्याचे पाहायला मिळत आहे.
उमेदवारी घोषित होण्याच्या अगोदर त्यांचे नाव चर्चेत चर्चेत होते तेव्हाच राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून त्यांच्या नावाची जोरदार चर्चा करण्यात आली होती त्यामुळे गुणवरे जिल्हा परिषद गटात ऋतुजा अभिजीत जगताप यांचे एकमेव नाव समोर आले होते व त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित दादा पवार गट व भारतीय जनता पार्टी महायुतीच्या वतीने आज उमेदवारी अर्ज दाखल केला .
ऋतुजा अभिजीत जगताप यांना उमेदवारी मिळाल्याने व सर्वसमावेशक उमेदवार असल्याने त्यांच्या उमेदवारीबाबत सर्वसामान्यातून आनंद व्यक्त होत आहे.