ताज्या घडामोडी

कोळकी जिल्हा परिषद गटातून राष्ट्रीय समाज पक्षाचे काशीनाथ शेवते उमेदवार मैदानात

(जावली /अजिंक्य आढाव )- जिल्हा परिषद आणि पंचायत समिती स्वबळाचा  नारा देत  राष्ट्रीय समाज पक्षाचे कोळकी जिल्हा परिषद गटामधुन काशीनाथ शेवते यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.

कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना अतिशय दुर्गम आणि डोंगराळ भागातील जावली गावातील मध्यमवर्गीय कुटुंबातील व शेतकरी कष्टकरी वर्गातील व्यक्तीला राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने काशिनाथ शेवते यांना प्रदेशाध्यक्ष पदावरती कामकाज करण्याची संधी देऊन महाराष्ट्र मध्ये राष्ट्रीय समाज पक्षाची मोठी ताकद निर्माण केली हाच राजकीय अनुभव प्रतिष्ठा पणाला लावत. कोळकी जिल्हा परिषद गट लढवणार असल्याचे मत माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.पाणी, वीज, शिक्षण, आरोग्य, दळणवळण यांसारख्या मूलभूत सेवांचा विकास, त्यांची देखभाल आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रश्न सोडवणार असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले

Related Articles

Back to top button
Don`t copy text!