(जावली/ अजिंक्य आढाव) बरड जिल्हा परिषद गटातुन राष्ट्रीय काँग्रेस पक्षातुन गंगाराम अरुण रणदिवे यांनी अर्ज दाखल केला असून यावेळी फलटण तालुका राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष श्री.महेंद्र सुभाषराव सूर्यवंशी(बेडके) यांच्या नेतृत्वाखाली गेली १९ वर्षे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम करणारे मुंजवडी गावचे युवा नेतृत्व सातारा जिल्हा युवक काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्री.गंगाराम अरुण रणदिवे राजकीय, सामाजिक चळवळीमध्ये तसेच जनतेच्या मुलभूत प्रश्नांसाठी आवाज उठवणारा कार्यकर्ता आहेत अस मत माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.
मुंजवडी,निंबळक,राजुरी,बरड,बागेवाडी,कुरवली, आंदरुड,जावली,मिरढे,वडले गावांमध्ये युवा वर्ग व नागरिकांसोबत मोठ्या प्रमाणात जनसंपर्क असल्यामुळे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या विचारधारेचा बालेकिल्ला असलेल्या बरड जिल्हा परिषद गटामधून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे.
या वेळी फलटण तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र सुभाषराव सूर्यवंशी (बेडके ), फलटण नगरपरिषदेचे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नगरसेवक पंकज पवार, धनंजय गोरे या वेळी उपस्थित होते.