आपला जिल्हा

आ.सचिन पाटील यांनाच सांगता येईना राष्ट्रवादीसाठी सुटलेल्या गटाचे व गणाचे नाव

(फलटण /प्रतिनिधी) – आज जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक साठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. फलटण तालुक्यामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांची युती झाली असल्याची माहिती फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील व श्रीमंत शिवरूपराजे यांनी संयुक्तपणे पत्रकारांना दिली.

पत्रकारांशी बोलताना आमदार सचिन पाटील म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी २ गट व ४ गट सुटलेले आहेत.यावेळी पत्रकारांनी आमदार सचिन पाटील यांना प्रतिप्रश्न केला की, राष्ट्रवादी काँग्रेससाठी कोणते गट व कोणते गण सुटलेले आहेत या प्रश्नाला उत्तर देताना आमदार सचिन पाटील यांना आपल्याच पक्षासाठी सुटलेल्या गटाची व गणाची माहिती देता आली नाही.

यानंतर तात्काळ श्रीमंत शिवरूपराजे यांनी आमदार सचिन पाटील यांना सावरून घेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेससाठी सुटलेल्या गटाची व गणाची माहिती दिली.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!