३३ गावांचा ‘डीजे बंद’चा नारा ; १५ गावांत ‘एक गाव, एक गणपती’चा निर्धार ! – प्रशांत सुबनावळ सहाय्यक पोलीस निरीक्षक,फलटण ग्रामीण पोलीस ठाणे यांची माहिती ..!
(जावली /अजिंक्य आढाव ): शांतता, सामाजिक सलोखा आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला चालना देण्यासाठी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत राबविण्यात येत असलेल्या ‘डीजे मुक्त मिरवणूक’ आणि ‘एक गाव, एक गणपती’ या उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पोलीस प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत तब्बल ३३ गावांनी डीजेमुक्त गणेशोत्सव मिरवणुकीचा निर्धार, तर १५ गावांनी ‘एक गाव, एक गणपती’ उपक्रमाचा सकारात्मक निर्णय घेतला आहे.
मा. पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडुकर व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध जनजागृतीपर व सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत.
३३ गावांचा डीजेमुक्त गणेशोत्सवाचा निर्धार
मुंजवडी, उपळवे, काशीदवाडी, वडले, शेरे शिंदेवाडी, मठाचीवाडी, सरडे, वडजल, निंबळक, मुरूम, तातवडा, तिरकवाडी, खडकी, गिरवी, राजाळे, सोनवडी बुद्रुक, ढवळेवाडी (निंबोरे), मानेवाडी, वाघोशी, पिराचीवाडी, नाईकबोमवाडी, धुमाळवाडी सासकल, भाडळी बुद्रुक, आंदरुड, वाखरी, ढवळेवाडी (आसू), विंचुरणे, कुरवली बुद्रुक, राजुरी, मिरगाव, शिंदेनगर, टाकळवाडा आणि दालवडी या ३३ गावांनी डीजे मुक्त गणेशोत्सव मिरवणुकीचा निर्णय घेतला आहे.
१५ गावांत ‘एक गाव, एक गणपती’
शेरेचीवाडी, मानेवाडी, झडकबाईचीवाडी, ताथवडे, पिराचीवाडी, भाडळी बुद्रुक, तिरकवाडी, जाधववाडी, सावंतवाडी, राजळे, धुमाळवाडी, काशीदवाडी, गोळेवाडी, मांझेरी आणि उपळवे या १५ गावांनी ‘एक गाव, एक गणपती’ उपक्रमाचा सकारात्मक निर्णय घेतला आहे.
या उपक्रमामुळे ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण, सामाजिक एकोपा व सलोखा वाढविणे, पारंपरिक संस्कृतीचे जतन तसेच शांततामय व सुरक्षित वातावरण निर्माण करण्यास मोठी मदत होणार आहे. गणेशोत्सव हा उत्साहाचा आणि श्रद्धेचा सण असून तो शिस्त, सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याचा संदेश या उपक्रमातून दिला जात आहे.
फलटण ग्रामीण पोलीस प्रशासनाने सर्व गणेश मंडळे व नागरिकांना पोलीस प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करून शांततामय, सुरक्षित, शिस्तबद्ध व आदर्श गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे.
“एक गाव – एक विचार – एक उत्सव; डीजेमुक्त गणेशोत्सवातून सामाजिक सलोख्याचा आदर्श निर्माण करूया!”