(फलटण /प्रतिनिधी)फलटणच्या राजकीय वर्तुळात सध्या एका स्टेटसमुळे चर्चेला उधाण आले असून, “निधी ज्यांनी आणला, श्रेयाचा हक्कही त्यांचाच!” या आशयातून श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आजच्या स्टेटसमधून विद्यमान आमदार सचिन पाटील यांना अप्रत्यक्षपणे सूचक संदेश दिला आहे का..? अशी चर्चा रंगू लागली आहे.
सत्ता बदलली म्हणून कामाचा इतिहास बदलत नाही!
ज्या लोकप्रतिनिधींनी निधी आणला, पाठपुरावा केला आणि कामाला मंजुरी मिळवून दिली, त्या कामाचे भूमिपूजन अथवा लोकार्पण करताना त्यांना निमंत्रित करण्याचा मोठेपणा दाखवणे हीच लोकशाहीची आणि राजकीय संस्कृतीची खरी ओळख.
“निधी ज्यांनी आणला, श्रेयाचा हक्कही त्यांचाच!”
श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या आजच्या स्टेटसमधून आमदार सचिन पाटील यांना सुचक इशारा..?
आमदार कोण आहे, हा प्रश्न नाही…!
कामासाठी निधी कोणी आणला, पाठपुरावा कोणी केला आणि मंजुरी कोणी मिळवून दिली, हा खरा प्रश्न आहे.. !त्यामुळे आजच्या स्टेटसमधून श्रीमंत रामराजे नेमका कोणता संदेश देत आहेत..?
“सत्तेचा बदल होऊ शकतो; पण विकासकामांचा इतिहास बदलता येत नाही…!”
आता या सुचक इशाऱ्यावर आमदार सचिन पाटील भविष्यात तरी काय भूमिका घेतात, याकडे फलटणच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.