(फलटण / प्रतिनिधी)- शिक्षकांनी केलेल्या कामाचा गुणगौरव व त्याच्या पाठीवर टाकलेली शाबासकीची थाप ही शिक्षकांसाठी नवीन ऊर्जा प्रेरणा देत असते असे मत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजिवराजे निंबाळकर यांनी व्यक्त केले.
विडणी येथिल उत्तरेश्वर विद्यालय व ज्यु.कॉलेज मध्ये आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करणेत आले होते.यावेळी ते बोलत होते,यावेळी श्रीराम साखर कारखान्याचे चेअरमन डॉ.बाळासाहेब शेंडे,संस्थेचे अध्यक्ष हणमंत अभंग उपाध्यक्ष डॉ.सुचिता शेंडे सचिव राजीव पवार डॉ.किरण शेंडे विठ्ठल नाळे मारुती नाळे आदीची उपस्थिती होती.
यावेळी संस्थेच्या प्राचार्य शुभांगी शिर्के ,संतु पिचड,जि.प.शिक्षक बापुसो बोराटे यांना श्रीमंत संजिवराजे निंबाळकर यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.तसेच माजी सेवानिवृत्त शिक्षकांचा देखील यथोचित सन्मान व गुणगौरव करणेत आला.यावेळी शुभांगी शिर्के संतु पिचड, बापुसो बोराटे यांनी मनोगते व्यक्त केले.